महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर सह हृदयरोग, लघवीचे विकार, अस्थीदोष, दंत तपासणी सह जनरल तपासणी होणार मोफत
कणकवली (प्रतिनिधी) : शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी ठीक. १०.०० वाजता ग्रामपंचायत वरवडे आणि एस. एस. पी. एम. लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे येथे सकाळी १० ते ०१:३० पर्यंत या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, यूरोलॉजी तपासणी, अस्थी रोग तपासणी ,कर्करोग तपासणी ,नेफरोलॉजी तपासणी, दंत रोग तपासणी नेत्र तपासणी, इसीजी, बी एस एल. बोन डिसीज इत्यादी. तपासण्या होणार आहेत. तरी सर्व गावातील महिला भगिनींनी वेळेत उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा अशी विनंती सरपंच ग्रामपंचायत वरवडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.













