दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत रेल्वे प्रबंधक कणकवली यांना निवेदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : रेल्वेमध्ये दिव्यांगसाठी असलेल्या डब्यात इतर प्रवाशी प्रवास करतात. त्यामुळे दिव्यांगाना प्रवास करणे मुश्किल झाले आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन दिव्यांगच्या डब्यातून इतर प्रवाशी प्रवास करू नये यासाठी कडक उपाययोजना करावी. अशी मागणी एकता दिव्यांग विकास संस्था कणकवली व मैत्रेय दिव्यांग संघटना वैभववाडी यांच्यावतीने निवेदनाद्वारे रेल्वे प्रबंधक यांच्याकडे केली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे रेल्वे प्रबंधकांकडून आश्वसन देण्यात आले.

कोकण रेल्वेमधून प्रवास करत असताना किंवा कोकण रेल्वेच्या दिव्यांग डब्यात मध्ये चढत असताना दिव्यांगांसाठी असणारा डबा हा उघडला जात नाही किंवा डब्यामध्ये चढल्यानंतर त्या ठिकाणी सुदृढ लोक बसलेली असतात आणि ही लोकं दिव्यांग प्रवाशांना त्रास देतात. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीला डब्यात चढूनही जागा मिळत नाही. अशा बिकट अवस्थेतही दिव्यांग व्यक्ती प्रवास करत असतो. अशा वेगवेगळ्या समस्यांचे निवेदन घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी आणि त्यावर ठाम निर्णय घेण्यासाठी एकता दिव्यांग विकास संस्था कणकवलीच्या वतीने व मैत्रेय  दिव्यांग संघटना वैभववाडी यांच्या सहकार्यातून कणकवली  रेल्वे प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये विविध प्रकारच्या मागण्यांचा उल्लेख केलेला आहे. तसेच सबंधित रेल्वे प्रबंधक यांनी सदर निवेदनावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही सांगितले.

यावेळी मैत्रेय दिव्यांग संघटना वैभववाडीचे अध्यक्ष राजेन्द्र कदम,एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत,खजिनदार  बाळकृष्ण  बावकर सदस्य  दिपक दळवी, आदेश  कारेकर , यल्लपा कट्टीमणी समीर तेलग्गी अशोक पाडावे जयवंत पाटील आदी उपस्थित होते..

error: Content is protected !!