सरस्वती विजयकुमार दुबे या महिलेचे समर्थ आश्रम कडून कुटुंब पुनर्मिलन

रस्त्यावर निराधार आढळणाऱ्या मानसिक रुग्ण बांधवाना तात्काळ आधार मिळणे जरुरीचे – संदिप परब

खारेपाटण (प्रतिनिधी) रस्त्यावर निराधार अवस्थेत आढळणा-या मानसिक आजारी व्यक्ती आपले बांधव आपले आहेत त्यांना तात्काळ आधार आणि सुरक्षित जीवन मिळायला पाहिजे. असे प्रतिपादन संदिप परब यांनी मुंबई बांद्रा येथील बिकेसी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सरस्वती विजयकुमार दुबे,वयः34 वर्षे या मानसिक आजारी व बेवारस अवस्थेतील महिलेला जीवन आनंद संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रम मधे दाखल करण्यात आले त्यावेळी केले. या महिलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एम.झुगरे, बी.के.सी पोलीस स्टेशन यांच्या पत्रानुसार नुकतेच समर्थ आश्रमातून तिची आई सरलादेवी केदारनाथ पांडे यांच्या ताब्यात देवून महिलेचे कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले.

दि.१० जानेवारी २०२५ रोजी भारतनगर मस्जिद जवळ एक बेवारस महिला ही एकटीच फिरत असल्याबाबत कॉलर नामे मकसूद कुरेशी, वय – ३४ वर्षे राहणार भारतनगर यांनी कॉल करून पोलिसांना कळविले. त्यावरून बीकेसी पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी दखल घेवून महिलेला निवारा आणि सुरक्षितते कामी संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रमात दाखल केले होते. समर्थ आश्रमात सरस्वती दुबे हिचे आश्रमातील लिझा ,निलम व लिलाबाई या भगीणीनसह नर्स दिपाली मेघा माळी व केअरटेकर चंदा छेत्री यांनी औक्षण करून तीला भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. समर्थ आश्रम इनचार्ज भाईदास माळी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!