अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुक्तांगण प्री स्कूल, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कणकवली जानवली येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुक्तांगण प्री स्कूल, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कणकवली, जानवली येथे गुरु पौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, गीत आणि गुरु वंदनेचे सादरीकरण केले. तसेच मुक्तांगण प्रीस्कूलमधील विद्यार्थ्यांनी “प्रथम गुरु – आई-वडील” या संकल्पनेवर आधारित आगळावेगळा पाद्यपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. भारतीय संस्कृतीनुसार आई-वडील हेच मुलांचे पहिले गुरु असल्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. गुरुपौर्णिमेला गुरु, शिक्षक तसेच पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील गुरुतत्त्व, कुटुंबातील संस्कारांचे महत्त्व आणि पालकांबद्दलचा आदर प्रत्यक्ष कृतीतून अनुभवता आला. उपस्थित शिक्षकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत, अशा संस्कारक्षम उपक्रमांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, ज्ञानाचे मूल्य आणि संस्कारांचे स्थान याविषयी मार्गदर्शन केले. संस्थेच्या सचिव सुलेखा राणे मॅडम, खजिनदार रमेश राणे सर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तर संस्थेच्या शैक्षणिक समन्वयक प्रणाली सावंत मॅडम, मुख्याध्यापिका अनघा राणे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!