‘पक्षवाढीसाठी जोमाने काम करणे हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली’ – मोंड येथील कार्यक्रमात अबिद नाईकांचे आवाहन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आज दिनांक 29 जुलै रोजी स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी जनसेवा साप्ताह निमित्त देवगड तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मोंड येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत देवगड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रशीद खान, प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे, जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी यानी मोंड ग्रामपंचायत येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर मोंड येथील बाळा कोयंडे यांच्या सभागृहात स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे स्तब्ध राहून अभिवादन केले. जिल्हाध्यक्ष अबिद नाईक मार्गदर्शन करताना स्वर्गीय अजित दादा यांच्या अकाली निधनाने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तरी आपण खचून जाता कामा नये राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी जोमाने काम केले पाहिजे तीच खरी अजित दादा यांना श्रद्धांजली ठरेल त्याचबरोबर दादा हे कामाचे माणूस म्हणुन त्यांची ख्याती होती
कार्यक्रमावेळी देवगड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रशीद खान,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य बाळासाहेब कोयंडे,जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.













