केंद्रीय बंदरे जहाजबांधणी, जलमार्ग मंत्री आणि महाराष्ट्राचे बंदरे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंची भेट

महाराष्ट्राच्या विकसित जलमार्गाला ठरणार बूस्टर डोस

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची परिवहन भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राचा सर्वांगीण विकास, लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे, मत्स्य बंदरे व किनारी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, किनारी जलवाहतूक व अंतर्गत जलमार्गांना चालना देणे, तसेच सागरी पर्यटनाच्या विकासाला गती देणे या दृष्टीने ‘सागरमाला २.०’ अंतर्गत विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रस्तावित आहेत. या विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. ‘विकसित भारत @२०४७’ या संकल्पनेच्या अनुषंगाने सदरील प्रकल्पांचे महत्त्व लक्षात घेता, महाराष्ट्रातील विविध प्रकल्प मार्गी लावण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनवाल यांनी दिल्याची माहिती ना. नितेश राणे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!