जिल्ह्यात होणार जादूटोणा विरोधी कायदाची कार्यशाळा

कुडाळ (प्रतिनिधी) : जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती PIMC आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत एकदिवसीय प्रात्यक्षिकासह कार्यशाळा रविवार दि . १९ रोजी कुडाळ हायस्कुल कुडाळ येथे अध्यक्ष ॲड. राजीव बिले यांचे अध्यक्षते खाली संपन्न होत आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन अनिल पाटील जिल्हाधिकारी तथा PIMC अध्यक्ष सिंधुदुर्ग यांच्या हस्ते होणार आहे . तर प्रमुख पाहुणे म्हणून माः संतोष चिकणे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण तथा सचिव PIMC , मा . सौरभकुमार अग्रवाल जिल्हा पोलिस अधिक्षक सिंधुदुर्ग, ऐश्वर्या काळूशे उपविभागीय अधिक्षक महसूल कुडाळ, विरसिंग वसावे तहसिलदार , राजेंद्र मगदूम पोलिस निरीक्षक , महेश ठाकूर मुख्याध्यापक कुडाळ हायस्कूल , रुपेश धुरी मानसोपचार तज्ञ, आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार. या कार्यशाळेत जादूटोणा विरोधी कायद्याची संपूर्ण माहिती देऊन कायद्यातील अनुसूचींचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येणार. तरी जिल्ह्यातील सुजाण नागरीकांनी या कार्यशाळेत उपस्थित राहून जादूटोणा विरोधी कायदा समजून घ्यावा असे आवाहन अध्यक्ष राजीव , संघटक विजय चौकेकर आणि सचिव कानशिडे यांनी केले आहे . या कार्यशाळेचे संयोजन कुडाळ तालुका अध्यक्ष ॲड. समिर कुळकर्णी व त्यांच्या सर्व तालुका कार्यकारीणी पदाधिकारी यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!