युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २ फेब्रुवारी रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित विमान प्रवासासह ISRO भेट व अडीज लाखाची रोख बक्षिसे असलेली सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2025 रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी ११.०० ते १.०० यावेळेत आयोजित करण्यात आली आहे . हे परिक्षेचे ८ वे वर्ष असून सिधुदुर्ग जिल्ह्यात 30 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हातून १२,४६७ विद्यार्थ्यानी नोंदणी केली असून प्रत्येक इयत्तेतील पाहिल्या ५० अशा २५० गुणवंत विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांची रोख बक्षिसे सन्मानचिन्ह,मेडेल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच 4 थी, 6 वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) या संस्थेला व २ री, ३री , च्या टॉप फाईव विद्यार्थ्याना गोवा येथील सायन्स सेंटर ला भेटी साठी घेऊन जाण्यात येणार आहे.

या परीक्षेचे मुख्य परीक्षा केंद्रे – कणकवली कॉलेज, कणकवली येथे असून इतर परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे
@ फोंडा हायस्कूल
@ जि प शाळा खारेपाटण न १
@ वामनराव महाडिक विद्यालय,तरेळे
@ शिरगाव हायस्कूल
@ शाळा जामसंडे न १,देवगड
@ शाळा कुणकेश्वर न १, देवगड
@ पडेल हायस्कूल, पडेल
@ रामगड हायस्कूल
@ आचरा हायस्कूल
@ टोपीवाला हायस्कूल,मालवण
@ वराडकर हायस्कूल कट्टा
@ जि प शाळा कुडाळ पडतेवाडी
@ नाथ पै इंग्लिश स्कूल
@ बिबवणे हायस्कूल
@ पणदूर हायस्कूल
@ प्राथमिक शाळा कुडाळ कुंभारवाडा
@ न्यू इंग्लिश स्कूल कसाल
@ वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव
@ RPD हायस्कूल ,सावंतवाडी
@ सैनिक स्कूल,आंबोली
@ शाळा माडखोल न १
@ शाळा मळेवाड न १
@ खेमराज हायस्कूल,बांदा
@ कलंबिस्त हायस्कूल सांगेली
@ मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव
@ न्यू इंग्लिश स्कूल दोडामार्ग
@ न्यू इंग्लिश स्कूल भेडशी
@ वेंगुर्ला हायस्कूल
@अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी

उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. तसेच निकाला दिवशी पालक/शिक्षक/विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे. यावर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी , पालघर व ठाणे जिल्हात आयोजित करण्यात आली आहे. युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा संजना संदेश सावंत (माजी जि प अध्यक्ष) यांनी सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा 2025 साठी सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या असून अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख सुशांत मर्गज (९४२०२०६३२६), प्रमोद पवार ९४२१२६६७५१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!