पोलीस प्रशासन सर्व ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – राहील-आचरा पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार

चिंदर ग्रामपंचायत येथे ग्रामसंवाद कार्यक्रम संपन्न

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशाने आचरा पोलीस निरीक्षक – यांच्या अध्यक्षतेखाली चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात चिंदर ग्रामस्थांसाठी ग्रामसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आचरा पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी सायबर गुन्हे कसे घडले जातात, यातून कोणती काळजी घेणे गरजेचे आहे? त्याचप्रमाणे विविध प्रकारचे गुन्हे घडू नयेत, यासाठी दक्षता कशी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले.

मोबाईलवर येणाऱ्या अनोख्या लिंक्स किंवा फेक संदेश यांचा वापर टाळणे आवश्यक आहे. सायबर फसवणूक समाजात वाढत आहे. यासाठी सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आपल्याला कोणतीही शंका आल्यास नजीकचे पोलीस स्टेशन, पोलीस पाटील यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. पोलीस प्रशासन सर्व ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – राहील, असे आवाहन आचरा पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी चिंदर येथे केले. तसेच ग्रामस्थांच्या विविध शंकांचे निरसन केले. ग्रामपंचायत, पोलिस पाटील, पोलिस यांची नेहमी सहकार्याची भूमिका असून गाव सुरक्षित राहायचा असेल तर प्रत्येकाने काळजी घेणे सुजान नागरिक म्हणून आपल्या सर्वांची जबादारी आहे.असे मत यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केले.

यावेळी सरपंच नम्रता पालकर-महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, माजी सरपंच धोंडी चिंदरकर, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश साळसकर, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी घाडी, सानिका चिंदरकर, सोसयटी चेअरमन देवेंद्र हडकर, माजी सभापती हिमाली अमरे, केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, पोलिस पाटील दिनेश पाताडे, चिन्मयी पाताडे, सचिन आचरेकर, मंगेश नाटेकर, सोनाली माळगांवकर, प्रतिक्षा पालकर, स्वप्ना चिंदरकर, समृध्दी अपराज, हर्षद बेनाडे, विकास पाताडे, गोपाळ लब्दे, उज्ज्वला पवार, शुभांगी लोकरे-खोत, स्मिता जोशी, पूजा विभूते, योगिता उपरकर, राजेंद्र प्रसाद गाडी, नंदकुमार जुधळे, सचिन तवटे, सरिता भाटकर, साधना पाताडे, दुर्वा चिंदरकर, विश्राम माळगावकर, समिर अपराज, रोहित पाटील, रोशनी फर्नांडिस, रणजित दत्तदास, सिध्देश नाटेकर, प्रिया पालकर, मनोज पुजारे, स्वप्निल गोसावी, मंगेश गोसावी, अन्ना गोसावी, किशोर खोत तसेच बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!