घोणसरी येथील सेंट सेबीस्टीन चर्च चा 130 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

माजी पं स सभापती मनोज रावराणे यांनी ख्रिस्ती बांधवाना दिल्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोणसरी गावातील सेंट सेबेस्टिन चर्च चा 130 वा वर्धापनदिन ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात 21 जानेवारी रोजी संपन्न झाला. सेंट सेबीस्टीन चर्च 1895 साली बांधण्यात आले होते. या चर्च मध्ये घोणसरी गावातील ख्रिस्ती बांधव आपले सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात, प्रार्थना करतात. चर्च च्या वर्धापनदिननिमित्त माजी पं स सभापती मनोज रावराणे यांनी उपस्थित राहत समस्त ख्रिस्ती बांधवाना शुभेच्छा दिल्या. फादर ऑलवीन फर्नांडीस यांच्या हस्ते मनोज रावराणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. घोणसरी येथील हॉली क्रॉस ची शेड मनोज रावराणे यांनी बांधून देत ख्रिस्ती बांधवांची मागणी पूर्ण केली. याबद्दल घोणसरी गावातील सर्व ख्रिस्ती बांधवांनी त्यांचे आभार मानले. चर्चच्या वर्धापनदिन समारंभास फादर विल्यम साल्डाना,फादर ज्यो,फादर फ्रँकलीन तसेच सिस्टर सोफी व सेंट उर्सुला च्या सिस्टर उपस्थित होत्या . कार्यक्रमाच्या शेवटी इशेद पिंटो ,व्हॅलेरीयन पिंटो, सेलेस्तीन रैस,जेरोन बारेत व सेलीना पिंटो यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.

error: Content is protected !!