“एसएसपीएम इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये साप्ताहिक प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन”

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली येथे अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (ए.आय. सी.टी.ई.), ट्रेनिंग अँड लर्निंग (अटल) अॅकडेमी, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने, कंप्युटर सायन्स आणि इंजिनिरिंग (AIML) विभागाद्वारे “Principles, techniques and perspective on optimization techniques in engineering and future trends” या साप्ताहिक प्रशिक्षण कार्यशाळेचे उ‌द्घाटन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव चे प्राध्यापक डॉ. अशोक जी मतानी यांचे हस्ते संपन्न झाले.

यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. दुरादुंडी सावंत.बाडकर सर समन्वयक, सहसमन्वयक प्रा. सुप्रिया नलावडे, डीन अकॅडेमिक डॉ . महेश साटम, प्राध्यापक सचिन वंजारी मेकॅनिकल इंजिनिरिंग विभाग प्रमुख, प्राध्यापक डॉ. रावसाहेब ठोंबरे इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख, प्राध्यापक दर्शन म्हापसेकर कंप्युटर इंजिनिरिंग विभाग प्रमुख , प्राध्यापक डॉ. नितीन शिवशरण कंप्युटर सायन्स विभाग प्रमुख, प्राध्यापक अजित गोसावी मेकॅट्रॉनिकस विभाग प्रमुख, यांची उपस्थिती होती.


या कार्यक्रमासाठी एकूण 105 प्राध्यापकांनी नावनोंदणी केली होती. या कार्यक्रमासाठी ए.आय.सी.टी.ई. अटल अकॅडेमीतर्फे अर्थसहाय्य करण्यात आले. यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर, यांनी प्रास्ताविकपर भाषणात प्रशिक्षण कार्यशाळेचे (एफ.डी.पी.) महत्त्व व त्याचे भविष्यात होणारे फायदे याची माहिती दिली. तसेच सहसमन्वयक प्रा.सुप्रिया नलावडे यांनी आर्टिफिशिअल इंटीलिजन्स आणि मशीन लर्निंग याची भविष्यात असलेली गरज यावर मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे, संस्थेच्या अध्यक्षा निलम राणे, उपाध्यक्ष आमदार निलेश राणे तसेच सचिव मत्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!