फोंडाघाट (प्रतिनिधी) : शिंगोबा डोंगराच्या ऐतिहासिक पायथ्याशी, सद्गुरु गगनगिरी महाराज यांच्या हस्ते स्थापित, निसर्गाच्या सर्वांग सुंदर परिसरात, अन् भक्तांच्या हाकेला सदैव धावून जाणारा श्रीशृंगेश्वर आणि त्याचा “माघी गणेश जयंती सोहळा” शनिवार तारीख १ फेब्रुवारी २५ रोजी आयोजित केला आहे. या सोहळ्याला परिसरातील सर्व भाविकांनी, अबाल- वृद्धांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शृंगेश्वर मित्रमंडळ दळवीवाडी- वडण यांनी केले आहे..
या निमित्ताने सकाळी सहा ते आठ वीस श्री तुकाराम रघुनाथ रासम-सी.ए. यांचे हस्ते श्रीशृंगेश्वर- गणेशावर महाअभिषेक -पूजा.सकाळी आठ ते दहा तीस श्रीसत्यनारायण महापूजा. दहा तीस ते बारा तीस श्री लिंगेश्वर प्रासा. भजन मंडळ जानवली यांचे भजन. दुपारी १२:३० महाआरती व महाप्रसाद. दुपारी एक ते २:३० श्री ज्ञानेश्वर माऊली प्रास. भजन मंडळ- खंबाळे, वैभववाडी यांचे भजन. दुपारी दोन ते सहा महिलांसाठी हळदीकुंकू.दुपारी दोन तीस ते चार श्री रवळनाथ प्रासा. भजन मंडळ, मोसम- राजापूर यांचे भजन. दुपारी चार ते पाच श्री गांगेश्वर प्रासा. भजन मंडळ, गडमठ -सुतारवाडी यांचे भजन सायंकाळी पाच ते सहा श्री सिद्धेश्वर प्रासा.भजन मंडळ कोकीसरे यांचे भजन.सायंकाळी सहा ते सात श्री माऊली प्रासा.भजन मंडळ कणकवली यांचे भजन.सायंकाळी सात ते नऊ वरचीवाडी मांडदेव प्रासा. दिंडी भजन मंडळ मोहूळ- संचालक धोंडी अण्णा रासम यांचे दिंडी भजन आणि रात्री नऊ तीस वाजता नाईक- मोचेमाडकर पारंपारिक दशावतारी लोकनाट्य मंडळ मोचेमाड, वेंगुर्ला यांचे “अक्षयपात्र” दशावतारी नाटक. इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













