महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभाग मंत्री आशिष शेलार यांची पेंडूर मांड उत्सवास भेट
सपत्नीक श्रीदेवी जुगाई, सातेरी, श्रीदेव वेताळ चरणी नतमस्तक
चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील पेंडूर येथे सुरू असलेल्या त्रैवार्षिक मांड उत्सवास आज गुरुवार दिनांक २३ जानेवारी रोजी दुपारी महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभाग मंत्री आशिष शेलार यांनी सपत्नीक भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत बंडया सावंत, राजू राऊळ आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी पत्नी आणि कुटुंबीयांसोबत श्रीदेव वेताळ,श्रीदेवी जुगाई चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.
यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने वेताळ मंदिर परिसरातील व्यासपीठावर मंत्री आशिष शेलार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे सचिव अमित कुळकर्णी यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा सत्कार करण्यात आला, तसेच पेंडूर सरपंच सौ. नेहा परब आणि उपसरपंच सुमित सावंत यांच्या हस्ते आशिष शेलार यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम सावंत पटेल, सचिव अमित कुळकर्णी, खजिनदार सुनील परब, विश्वस्त दाजी सावंत, रमेश सावंत, दिलीप परब, प्रमोद परब, नंदकुमार परब, बिपिन परब, गजानन सावंत, आप्पा सावंत, भाऊ पटेल, रामू सावंत, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, अमित पटेल, प्रमोद सावंत पटेल, भाजप कार्यकर्ते बंड्या सावंत राजू राऊळ, इतर पदाधिकारी व देवस्थान मानकरी उपस्थित होते.
सत्कारानंतर बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी असे प्रतिपादन केले की, आपल्या धार्मिक प्रथा, परंपरा, संस्कृती यांची जी काय जपणूक आपण करून ठेवली आहे ही या महाराष्ट्राची खरी शान आहे. आपल्या कोकणामध्ये महाराष्ट्राच्या मातीमधील कणाकणामध्ये रुजलेला आपला देव आहे. शेतकरी असो कष्टकरी असो कातकरी असो अथवा कामगार असो हा सगळा मराठी माणूस एकमेकातही देव बघतोच पण आपल्या धार्मिक उत्सवाचं आणि त्याबरोबरच असलेल्या जत्रेचे महत्त्व विशेषतः कोकणामध्ये याला अगम्य स्थान आपल्या आयुष्यामध्ये देतो. तब्बल १४ दिवस चालणाऱ्या या पेंडूर मांड उत्सवाचं यशस्वी आयोजन करणाऱ्या देवस्थान ट्रस्ट आणि पेंडूर ग्रामस्थांचं मी विशेष करून यावेळी कौतुक करतो. अशा उत्सवांना उपस्थित राहणं हे सांस्कृतिक मंत्री म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. या देवालयाला, देवस्थान ट्रस्टला अथवा गावाला जेव्हा जेव्हा सहाय्य, मदत, करण्याची गरज पडेल तेव्हा आमचं फडणवीस सरकार एक पाऊलही मागे पडणार नाही. आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर राहू. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जयंद्रथ परब यांनी के











