लुई ब्रेन डे जयंती निमित्त वागदे गोपूरी आश्रमात अंध बांधवांचे दोन दिवसीय सेहसंमेलन

वागदे सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते उदघाटन

कणकवली (प्रतिनिधी) : लुई ब्रेन डे जयंती निमित्त वागदे गोपूरी आश्रमात अंध बांधवांचे दोन दिवसीय स्नेहसंमेलनचे उदघाटन 22 जानेवारी रोजी करण्यात आले.यानिमित्त विविध फनी गेम्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.वागदे सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वागदे ग्रामसेवक युवराज बोराडे ग्रा.पं सदस्य दीपक कदम,दृष्टीहीन संघाचे अध्यक्ष बाबुराव गावडे,सचिव शेखर आळवे नंदहरी सावंत, प्रकाश वाघ शाम आजगावकर, एकता दिव्यांग संघाचे सुनील सावंत,संजय वारंगे सचिन सादये, दीपक बोभाटे ,विनय ओटवकर,दीपक दळवी आदी उपस्थित होते .यावेळी सरपंच संदीप सावंत यांनी मनोगत व्यक्त करून दृष्टीहीन संघ व उपस्थिताना शुभेच्छा दिल्या. भविष्यात आपणास जिल्ह्यातील लागणारी मदत पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी करू असेही संदीप सावंत यांनी सांगितलं.उपस्थित सर्व अंध बांधवांनी सरपंच यांचे आभार व्यक्त करून स्नेहसंमेलन निमित्त आयोजित स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

error: Content is protected !!