सिंधु किरण आचरा च्यावतीने आचरा तिठा येथे आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : नागरिकांमध्ये एकता आणि देशप्रेमाची भावना वाढावी हा मुख्य उद्देश ठेवून सिंधु किरण आचराच्यावतीने २६ जानेवारी रोजी आचरा तिठा येथे हिर्लैवाडी येथील माजी सैनिक कल्याण पेडणेकर यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारत माता पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, पोलिस तुकाराम पडवळ, इंग्लिश मिडीयम स्कूल कमिटी चेअरमन निलेश सरजोशी, आयोजक- वरद जोशी, अजित आचरेकर, समीर बावकर, मंदार सरजोशी, मंदार सांबारी, मुन्ना परब, चंदू कदम, सिद्धार्थ कोळगे, मांगीरीश सांबारी, संजय सामंत, रत्नाकर कोळंबकर, अशोक कांबळी आदी उपस्थित होते.
