सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : इतिहासात प्रथमच पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत सिंधुदुर्गात ११ हजार ८८१ घरकुले मंजूर झाली पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत २०२४-२५ साठी ११ हजार ८८१ एवढी घरकुले मंजूर झाली आहेत. एका आर्थिक वर्षात एवढ्या संख्येने प्रथमच घरकुले मंजूर झाल्याने या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून १७८ कोटी २१ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त होणार आहेत. यात कुडाळ तालुक्यात एकूण 2857 तर मालवण तालुक्यात 1007 घरकूल मंजूर झाली आहेत.
कुडाळ मालवण मतदारसंघात पंतप्रधान आवास अंतर्गत एकूण 3864 घरकुल मंजूर
