ओम गणेश मित्रमंडळाचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : ओम गणेश मित्रमंडळ, शिरवल टेंबवाडी आयोजित शनिवार दि १ फेब्रुवारी व रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी या कालावधीत माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.शिरवल लिंगरवळनाथ मंदिरासमोर माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. १ फेब्रुवारी २०२५ सकाळी ९.०० वा- श्री गणेश मुर्तीचे आगमन, आरती व तीर्थप्रसाद सकाळी ११.०० वा. श्रीसत्यनारायण महापूजा,दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद,दुपारी ३.०० ते ५.०० स्थानिकांची भजने,हरिपाठ (वारकरी संप्रदाय शिरवल) सायं ७.३० ते ८.३०,रात्री ८.३० ते १०.३० महाप्रसाद,रात्री १०.३० ते ११.३०स्थानिक रेकॉर्ड डान्स स्पर्धा मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, मोरे यांचे महान काल्पनिक नाटक सैतानी पाश रात्रौ ११.३० वा होणार आहे.
रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ सकाळी १०.३० वा. श्री गणेश मूर्तीची आरती व तिर्थप्रसाद दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद दुपारी ३ ते सायं ४.०० वा.महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी ४ वाजता गणेश मूर्ती विसर्जन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा आणि कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ओम गणेश मित्र मंडळ शिरवल यांनी केले आहे.