राष्ट्रीय स्तरावरील अॅबॅकस स्पर्धेत विद्यामंदिर कणकवलीचा चैतन्य तायशेटे दहावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील इयत्ता पाचवी व सहावी या वयोगटातील प्रोऍक्टिव्ह अॅबॅकस स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या इयत्ता पाचवीतील चैतन्य तायशेटे या विद्यार्थ्याने दहावा क्रमांक प्राप्त करून यशस्वी होण्याचा मान मिळवला. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 2500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. चैतन्यला डॉक्टर स्नेहल जोशी तसेच प्रशालेच्या गणित विषय शिक्षिका माहेश्वरी मठकर आणि वेदांती तायशेटे यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे शि.प्र.मं. कणकवली च्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सेक्रेटरी बाळासाहेब वळंजू, ट्रस्टी अनिल डेगवेकर, मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षिका व्ही. व्ही. जाधव, ज्येष्ठ शिक्षक अच्युतराव वनवे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!