पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विद्याधर तांबे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

समाजवेध संकल्प प्रतिष्ठान आयोजित सेवानिवृत्तीपर सन्मान सोहळा कणकवली येथे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षकी सेवेची व्रतस्थ कारकीर्द पूर्ण करत दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सेवानिवृत्त झालेले एक सेवाभावी आणि जि. प. सिंधुदुर्ग आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व सामाजिक समाजप्रिय व्यक्तिमत्व जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध संस्थांनी सन्मानित झालेले बहुआयामी कर्तृत्व समाज वेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान मूर्ती विद्याधर लक्ष्मण तांबे यांच्या सेवानिवृत्ती पर सन्मान रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सायं 6 वा. आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित नामदार नितेश राणे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे प्रमुख उपस्थित संदेश उर्फ गोट्या सावंत (माजी अध्यक्ष जि. प. सिंधुदुर्ग), कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल तांबे (अध्यक्ष कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई) व प्रमुख मान्यवर अरुण चव्हाण (गटविकास अधिकारी पंचायत समिती कणकवली), किशोर गवस (गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती कणकवली), ऋतुराज तेंडुलकर सरपंच ग्रामपंचायत कोंडये यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. सदर कार्यक्रमास सर्व मित्र परिवार आणि हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव शशिकांत तांबे यांनी केले आहे.

error: Content is protected !!