वारंवार लेखी कळवुनही अधिकाऱ्यांची कार्यवाहीस टाळाटाळ !
पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी लक्ष देण्याची फोंडाघाट प्रवासी संघटनेची मागणी !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : पर्यटन जिल्हा- सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावरील गाव फोंडाघाट ! परंतु या गावच्या महत्त्वाच्या एसटी स्थानकावरील प्रवाशांना अनेक अडचणींना असुविधांना सामोरे जावं लागत आहे. गेल्या दीड वर्षापूर्वीच मोठा गाजावाजा करून नवीन बांधलेले स्वच्छतागृहा चे संपूर्ण बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले आहे. गेल्या दीड वर्षातच संडासची भांडी निकृष्ट कोब्यामुळे खचली आहेत. नळाचे कॉक, आतील बादल्या, टमरेल गायब झाले आहेत. दरवाजाचे ऍक्रेलिक शिटस फुटलेले आहेत. त्यामुळे हे स्वच्छतागृह प्रवाशांना वापरण्यास अयोग्य बनले आहे. तीन -चार तास प्रवास करून आलेल्या प्रवाशांना स्वच्छतागृह नसल्याने आणि असलेले अस्वच्छतेने परिपूर्ण असल्यामुळे,प्रवासी वर्गातून कमालीचा संताप व्यक्त होत आहे.त्यामुळे येथील स्थानक प्रमुखांना त्यांच्या संतापाचा, वाद-विवादाचा सामना करावा लागत आहे.
याबाबत माहिती घेतली असता, संबंधित अधिकाऱ्यांना तीन-चार वेळा लेखी कळवुन सुद्धा योग्य कारवाई करण्यात आली नाही. स्वच्छतागृहाचे सुलभ शौचालयात रूपांतर करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छतादूत ठेवला असता तर ,ही परिस्थिती उद्भवली नसती. याबाबत बांधकाम अभियंता यांनी नवीन प्रस्ताव करण्याचे काम चालू असून, दोन-तीन महिन्यात कार्यवाईस सुरुवात होईल,असे बेजबाबदार उत्तर देऊन बोळवण केली. म्हणजे आणि दोन-तीन महिने प्रवाशांना तिकिटाचे पैसे अदा करून सुद्धा, असुविधानांना- अस्वच्छतेला सामोरे जावे लागणार आहे—
फोंडाघाट बस स्थानकावरील अस्वच्छ विहीर, विहिरीवरील सुरक्षा कव्हर नसणे, दुषित पाणीपुरवठा,पेपर स्टॉल- कटलरी स्टॉल- कॅन्टीन सदैव बंद, स्थानकावर स्लीपर- हमाल ची जागा रिक्त, स्थानकातील परिसरात जागोजागी खड्डे, जुने स्वच्छतागृह निर्लीखित केलेले नाही,सांडपाण्याची दुरावस्था, रिक्षा -सिक्स सीटर चे अवैध थांबे, अवैध गाड्यांचे पार्किंग,या सर्वावर कळस म्हणजे स्थानक परिसरातील विस्कळीत अधिकृत ओ नियोजनबद्ध बांधलेली दुकाने,यामुळे प्रवेशद्वारावरील ऐतिहासिक फोंडाघाट एसटी स्थानक ची दुरावस्थे कडे वाटचाल चालू आहे. प्रवाशांचे हाल सुरू आहेत. याबद्दल ग्रामस्थ व प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करून होत असून अधिकाऱ्यांच्या तसेच लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणाचा मार सहन करावा लागत आहे ….
याबाबत फोंडाघाट प्रवासी संघटना,पालकमंत्री नितेश राणे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधणार असून, बेपर्वाह, बेजबाबदार व टंगळमंगळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहे…












