पुर्व प्राथ-मधून कोकिसरेची कु.धनश्री माने तर उच्च प्राथ- मधून कलंबिस्तचा पारस दळवी आणि माळगावची यशश्री ताम्हणकर जिल्ह्यात अव्वल..

शिक्षक भारती, सिंधुदुर्ग व बॅ नाथ पै सेवांगण,कट्टा शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर !

तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा (पाचवी) परीक्षेत कोकिसरेची कु.धनश्री माने २८० गुणांसह जिल्ह्यात पहिली आली असून कु.स्वराध्या झेंडे (वजराठ नं.१) 270 गुणासह जिल्ह्यात दुसरी तर बांदा नं.१ ची कु.दुर्वा नाटेकर व कुंणकवळेचा शंकर सरनाईक- 260 गुणासह विभागून तिसरी आले आहेत. तर इयत्ता आठवी मधून कलंबिस्तचा पारस दळवी व माळगावची कु.यशश्री ताम्हणकर 250 गुणांसह जिल्ह्यात विभागून प्रथम आले आहेत तर मळगावची कु.समृध्दी राऊळ व आचरा येथील सुयश साटेलकर हे 240 गुणांसह जिल्ह्यात विभागून द्वितीय आले,तर कुडाळ हायस्कूलच्या दुर्वांक गावडे याने 234 गुणांसह जिल्ह्यात तृतीय येण्याचा मान पटकावला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाह तथा माजी अध्यक्ष संजय वेतुरेकर व सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत आडेलकर यांनी तसेच बॅ.नाथ पै सेवांगण शाखा कट्टा चे दिपक भोगटे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.


इयत्ता पाचवी सराव परीक्षा गुणवत्ता यादी पुढीलप्रमाणे –
१)कु.धनश्री माने- कोकिसरे-
(२८०),२)कु.स्वराधा झेंडे-
वजराठ- २७०,३)कु.दुर्वा नाटेकर-
बांदा.नं.१-२६०,४)शंकर सरनाईक -कुंणकवळे-२६०,५)अर्णव भिसे-
हरकुळ गावडेवाडी-२५६,६)नीरज परब वजराठ- २५६,७)भावेश तौर-कुडाळ -२५४,८)माधवेंद्र पाटील-कुडाळ -२४८,
९) अधीश्री परब -२४६,१०)कु.पियुषा नेहरकर -ओटवणे नं.२-२४६,११)
कु.दुर्वा गोठोसकर-२४५,१२ )ओम वाळके -कुडाळ-२४४,१३)प्रथमेश लांबर- आडेली.नं.१-२४४,१४)कु.वीरा घाडी-सावंतवाडी नं.४-२४४, १५)कु.गिरीजा नाईक-कुंणकवळे-२३८,
१६) कु.पूर्वा जीकमडे-रामगड-२३८,
१७)कु.मानसी चव्हाण-कुंणकवळे-२३८,
१८) कु.कारुण्या परब,-२३६,
१९) यशवंत तुळसकर-भेडशी-२३६,
२०)मधुर पेंदूरकर-वराडकर कट्टा-२३२,
२१)सुयश गोलतकर-शेठ म.ग.देवगड
-२३२,२२)चंद्रकांत गावकर-ओटवणे नं.४-२२८,२३)कु.माही घोंगे-वजराठ-
२२८,२४)कु.स्वरा बांदेकर-बांदा.नं.१
-२२८,२५)गौरांग ढवण-अ.रा.विद्यालय वैभववाडी-२२६,
२६)पार्थ बोलके -सावंतवाडी नं.४
-२२६,२७)शंकर परब-कारीवडे-२२६
२८)स्वयम शिरोलकर-२२६ गुणांसह गुणवत्ता यादीत आला आहे.
इयत्ता आठवी गुणवत्ता यादी
१)पारस दळवी- कलंबिस्त२५०- २)कु.यशश्री ताम्हणकर -मळगाव२५०,३)कु.समृद्धी राऊळ -मळगाव-२४०, ४)सुयश साटेलकर -आचरा -२४०,५)दुर्वांक गावडे -कुडाळ हाय-२३४, ६)सोहम कोरगांवकर आरपीडी सावंतवाडी-२३२, ७) कु.समृद्धी बडे- कनेडी हाय-२२८,८) मिहिर मिस्त्री पाट२२८, ९)शार्दुल गोठसकर -कुडाळ -२२८,१०)सतीश सोनसुलकर कुडाळ हाय–२२६, ११)कु.मुक्ता काळसेकर -काळसे -२२६,१२)अनंत काटकर -जांभवडे हाय -२२४,१३)वेद कुबल रेकोबा हाय-२२२,१४)वेणु सावंत-२२०,
१५)साक्षी गुरव आरपीडी-२१८,१६) वैभवी परब-म,गाव-२१६,१७)आर्या सरमळकर -कळसुलकर हाय-२१४,१८)कु.तन्वी दळवी -आरपीडी सावंतवाडी-२१४, १९)कु.क्षितिजा नाईक -दोडामार्ग-२१२, २०)वेदांगी तानावडे -कनेडी -हाय-२१०,२१)श्रावणी मेस्त्री -पंणदूर,२१०,२२) कार्तिकी वजराटकर -नाथ पै कुडाळ-२१०,२३) सुशांत आळवे- विद्यामंदिर कणकवली हाय- २०८,२४) आरुषी राणे-कूडाळ हाय- २०८, २५) शंभू पांढरे -तळवडे हाय-२०६,२६)जस्मिता पावस्कर विद्यामंदिर कणकवली-२०६,२७) कस्तुरी खानोलकर -पाट२०६,२८) -चिन्मयी कोरगावकर- पाट-२०६,२९)रिया राऊळ पाट-२०६ गुणांसह गुणवत्ता यादीत आली आहे.

२४३३ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा….

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 37 केंद्रांवर सराव परीक्षा घेण्यात आली यामध्ये पूर्व प्राथमिक मधून 1337 तर उच्च प्राथमिक मधून 1056 विद्यार्थि सहभागी.
एकूण 2433 विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा लाभ घेतला आहे.शिक्षक भारतीच्या शिलेदारांनी विशेष परिश्रम घेऊन ही परीक्षा यशस्वी केली होती.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होणार आहे. लवकरच ते संबंधित शाळा व पालकांना कळविण्यात येईल असे आवाहन शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!