छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त ओरोस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : स्पर्धा परीक्षेतील अग्रगण्य असलेल्या गुरुकुल करिअर अकॅडमी, ओरोस या संस्थेच्या वतीने शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन 19 फेब्रुवारी या दिवशी ओरोस येथे करण्यात आले आहे.

यावर्षी किल्ले रायगड ते ओरोस येथे पर्यंत पायी शिवज्योत व रायगड वरील पुण्यपावन माती, राज्यशस्त्र शिवकालीन दांडपट्टा, शिव प्रतिमा असलेली शिवपालखी आणण्यात येणार आहे. दिनांक 19 फेब्रुवारी दिवशी सकाळी ८.०० वाजता शिवज्योत व शिवपालखीच्या मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. यानंतर ओरोस येथील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात येईल. हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी शिवकालीन मर्दानी युद्ध कला, लेझीम यांची प्रात्यक्षिके गुरुकुल करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांकडून सादर केली जाणार आहे. तसेच चित्ररथ, वारकरी दिंडी आदी विविध कलाप्रकार सादर केले जाणार आहेत. गुरुकुल करिअर अकॅडमीच्या नवीन इमारतीत मिरवणूक आल्यावर शिवाजी महाराजांचे पूजन, शिवकालीन शस्त्र पूजन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण होणार आहे. जिल्ह्यातील शिवप्रेमींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गुरुकुल करिअर अकॅडमी, ओरोस यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!