ऍड. विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील प्रतिथयश वकील विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्तीकरण्यात आली आहे. ऍड. विलास परब हे कणकवली शहरात मागील 30 वर्षांहून अधिक काळ वकील म्हणून कार्यरत आहेत. आपल्या अशिलांना न्याय मिळवून देणारे सर्वसामान्य जनतेचे वकील म्हणून विलास परब यांची विशेष ओळख आहे. नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल ऍड.परब यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!