पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमांची सुरवात
वैभववाडी (प्रतिनिधी) : हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.असे प्रतिपादन वैभववाडी पोलीस निरीक्षक सुनिल अवसरमोल यांनी केले. खांबाळे केंद्र शाळा येथे मंगेश लोके मित्रमंडळ व शिवप्रेमी मित्रमंडळ यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. या दोन दिवसीय या कार्यक्रमाचर उद्घाटन वैभववाडी पोलीस निरीक्षक सुनिल अवसरमोल यांचे हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले.
१९ तारीखला सकाळी शिवप्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन सरपंच प्राजक्ता कदम,निवृत्त ए.सी.पी.हस्ते संपन्न झाले. यानंतर श्रीफळ वाढवुन पोलीस निरीक्षक सुनिल अवसरमोल यांचे हस्ते रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही मोटार सायकल व रिक्षा रॅली खांबाळे ते लोरे नं.2 येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ शिल्पाला पुष्पहार अर्पण करून थेट वैभववाडी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातुन रॅली खांबाळे येथे कार्यक्रम स्थळी आली. दुपारी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि लकी ड्रॉ कुपन काढण्यात आले. सामजिक कार्यकर्ते दीपक वसंत पवार यांच्या सौजन्याने सुवर्णा संतोष निग्रे,पूजा प्रमोद कदम,सुनंदा सदानंद पवार यांना लालबागच्या राजाची प्रतिमा भेट देण्यात आली. सुप्रसिद्ध भजनी बुवा संजय वासुदेव पवार यांच्या सौजन्याने महिलांसाठी आणि मुलींसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये संगीत खुर्ची स्पर्धा (महिला) प्रथम क्रमांक मानसी बुधाजी गुरव, दुसरा अक्षता अमित कर्पेक्रमांक,तिसरा क्रमांक प्रणिता प्रकाश पवार,चौथा क्रमांक अंजली अशोक पवार,पाचवा क्रमांक पूजा दीपक देसाई या महिलांना आकर्षक पैठणी साड्या व संगीत खुर्ची स्पर्धा (मुली) प्रथम क्रमांक गुंजन दिनेश पालकर, दुसरा क्रमांक निलम अजय पवार, तिसरा क्रमांक वैदही सत्यवान सुतार,चौथा क्रमांक पायल सुर्यकांत सुतार,पाचवा क्रमांक मानसी संतोष पवार यांना टिफिन डबा भेट देऊन गौरविण्यात आले.
दुसऱ्या दिवशीचे मर्दानी खेळ सुरू होण्यापूर्वी कथाकथन स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल शिक्षक हनुमंत सुतार व शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त होणारे शिक्षक यशवंत कांबळे आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत दाखल झालेली कु. फाल्गुणी हरिश्चंद्र जाधव प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (मलेरिया) प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे, वैभववाडी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन रात्रौ 9.30 ते 11.30 या वेळेत कोल्हापूर येथील खंडोबा-वेताळ तालीम मर्दानी खेळ पथकाने रणमर्द मराठ्यांच्या शिवकालीन युध्दकलेचा इतिहास असलेले मर्दानी खेळ आणि शाहीर मिलिंदा सावंत यांनी पोवड्यातुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अंगावर शहारे उभे राहतील असा धगधगता इतिहास आपल्या पहाडी आवाजात सादरीकरण केले. शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांनी कशाप्रकारे युद्धामध्ये आपल्या कौशल्य पणाला युध्द जिंकत होते, लढाई लढत होते याची प्रात्यक्षिके सादर केलीत आणि शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळी व्यासपीठावर माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके,सरपंच प्राजक्ता कदम, निवृत्त ए.सी.पी.प्रभाकर लोके,उपसरपंच मंगेश गुरव,पोलीस पाटील रूपेश कांबळे,राखी पवार,अस्मिता चव्हाण,माजी उपसरपंच तथा ग्रा.पं.सदस्य गणेश पवार,माजी जि.प.सदस्या दिव्या पाचकूडे,शांताराम कदम,गुरुनाथ गुरव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रियांका पवार,विलास प्रभु,शिक्षक हनुमंत सुतार,यशवंत कांबळे,सामाजिक कार्यकर्ते दीपक पवार,माजी चेअरमन दीपक चव्हाण,माजी सरपंच विठोबा सुतार,सारीका सुतार,माजी ग्रा. पं. सदस्य प्रमोद लोके,नंदकुमार पवार,दिनेश पालकर,जितेंद्र राणे, सत्यवान सुतार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक कदम,माजी चेअरमन सुनिल पवार,मेघनेश पवार,वैभव पवार,सुदर्शन गुरव सुनील गुरव,अरूण माळकर,योगेश परब,विक्रांत पवार,प्रकाश वासुदेव सुतार,अजय पवार,जयेश पवार यांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार पोलीस पाटील रुपेश कांबळे यांनी मानले.













