आमदार नितेश राणे यांनी शिवसेना-भाजप संयुक्त पत्रकार परिषदेत केले स्पष्ट
कणकवली (प्रतिनिधी) : राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. या सरकारमुळेच जनतेचा मूलभूत विकास होऊ लागला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा युतीचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ग्रामपंचायतीवर आम्ही शिवसेनेचे सरपंच बसवले. त्यामुळे कोणीही संशयाच्या चष्म्यातून पाहू नका.युतीचे हेच प्रतिबिंब जिल्ह्यातही दिसेल असा विश्वास शिवसेना भाजप युती संदर्भात आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कणकवलीत शिवसेना-भाजपची संयुक्त पत्रकार परिषद झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत आधी पदाधिकारी आमदार नितेश राणे यांच्या समवेत पत्रकार परिषदेला उपस्थित होते अशी संयुक्त पत्रकार परिषद प्रथमच झाले असल्याने पत्रकारांनी युती संदर्भात प्रश्न विचारले असता आमदार नितेश राणेंनी युतीतील प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते चे चांगले संबंध एका दुसऱ्याचे आहेत आणि ही युती टिकून ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.असे सांगताना आमदार नितेश राणे म्हणाले,ग्रामपंचायत निवडणुकांप्रमाणेच यापुढील सर्व निवडणुका भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून आम्ही लढविणार आहोत. महाविकास आघाडीने अडीच वर्षात आम्हाला प्रचंड त्रास दिला. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकले. काहींवर केसेस दाखल केल्या. आम्हाला झालेला हा सगळा त्रास बाहेर काढण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन करावं लागले. ग्रामपंचायत निवडणूक आम्ही युतीच्या माध्यमातून लढवली. त्याच धर्तीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका देखील आम्ही युतीच्या माध्यमातून लढविणार आहोत. युतीत कोणतेही वाद नाहीत.उलट चांगल्या समन्वयाने काम सुरु आहे. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असे शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. यात शिवसेनेचे चाळीस आणि दहा अपक्ष आमदार यांचा मोठा वाटा आहे. हे आमदार आमच्यासोबत आले म्हणूनच युतीचे सरकार होऊ शकले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती ही यापुढे देखील कायम राहणार असल्याचे आ.नितेश राणे यांनी सांगितले.