राहुल गांधींबद्दल उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे नौटंकी ; आ.नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपद घेतले तेव्हा वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्यात नव्हती. किंबहुना सत्तेसाठी राहुल गांधींना थांबवण्याची हिंमत केलेली नाही.आता सत्ता गेल्यानंतर आणि सर्व संपल्यानंतर हिंदू जनतेची सहानुभूती मिळावी म्हणून राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर ठणकावण्याची भाषा करणे ही उद्धव ठाकरे यांची निव्वळ नौटंकी आहे. असा घनाघात भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या निमित्तानेकणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ.नितेश राणे बोलत होते. ते म्हणाले, राहूल गांधी, नाना पाटोले आणि काँग्रेसची मंडळी वीर सावरकर यांचा सातत्‍याने अपमान करत आहेत. त्‍यांना योग्‍य तो संदेश देण्यासाठीच आम्‍ही ५ एप्रिल रोजी कणकवलीत भव्य अशी वीर सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत. यात हिंदुत्‍ववादी संघटनांचे कार्यकर्ते,सावरकर प्रेमी आणि सर्व जनतेने सहभाग घ्यावा असे आवाहन आ.नितेश राणे यांनी केले आहे.

स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच वीर सावरकर यांच्याबद्दल आदर बाळगला. सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या मनीशंकर अय्यर यांना जोडो मारो आंदोलनही केले. मात्र त्‍यांचे सुपूत्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद असताना राहुल गांधी वीर सावरकरांबद्दल एवढे बोलून सुद्धा शांत राहणे पसंत केले. ते मुख्यमंत्री असताना राहूल गांधी यांनी सावरकर यांच्यावर वारंवार टीका केली. परंतु उद्धव ठाकरे यांनी राहूल गांधी यांना रोखण्याची हिंमत दाखवली नव्हती. आता सत्ता गेल्‍यानंतर ते राहूल गांधी यांना ठणकवण्याची भाषा करत आहेत. ही त्यांची नौटंकी आहे. ढोंगीपणा आहे.अशाने हिंदू धर्मियांची सहानुभूती ठाकरे यांना मिळणार नाही. राहुल गांधी यांच्या आजोबा पंतप्रधान नेहरू हे मी अपघाताने हिंदू झालो आहे असे म्हणत होते हिंदुस्थानात राहणाऱ्या गांधी कुटुंबाची ही भावना असेल तर त्यांचे समर्थन करणाऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल असे आमदार नितेश राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!