कणकवली उपजिल्हा रुग्णालयसमोर मिळणार संस्कृती गुळाच्या चहाचा स्वाद
कणकवली (प्रतिनिधी) : रेगेश धूत्रे या बंधूनी संस्कृती अमृततुल्य चहाचा स्वतःचा ब्रँड बनवून चहाच्या व्यवसायामध्ये यशस्वी सुरुवात केली. पहिल्या शाखेच्या प्रथम वर्धापन दिनाच्या औचित्याने यांच्या द्वितीय शाखेचा शुभारंभ उपजिल्हा रुग्णालय कणकवली समोर उद्योगमित्र मा. श्री महेंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते दिनांक 30 मार्च 2023 रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला. सिंधुदुर्गमध्ये चहाच्या व्यवसायात जिल्हा बाहेरील अनेक ब्रँड उतरले असून आपल्या जिल्ह्यातील एकही स्थानिक अमृततुल्य चहाचा ब्रांड नव्हता परंतु धूत्रे परिवाराने आपला स्वतःचा ब्रँड बनवून या व्यवसायात वेगळा ठसा उमटविला आहे. तसेच सिंधुदुर्गातील सर्व तालुक्यात या अमृततुल्य चहाची फ्रेंचाईजी देऊन हा व्यवसाय वाढवण्याचा त्यांचा मानस आहे त्यांच्या या वाटचालीस श्री. महेंद्र चव्हाण आणि मित्र परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.