1,25000/- हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतून व कोल्हापूर शहरातून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असलेने त्यास आळा बसावा व चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणे करिता राजवाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये ज्या ठिकाणाहून मोटरसायकली चोरी जातात त्या ठिकाणी वॉच करून सक्त पेट्रोलिंग करण्याच्या राजवाडा पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव यांनी गुन्हे शोध पथकास सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे राजवाडा डीबी पथक पोलीस ठाणे च्या हद्दीमध्ये साध्या वेशात खाजगी गाडीने पेट्रोलिंग करत असताना आज रोजी 30 /03/23 सायंकाळच्या सुमारास रंकाळा टॉवर येथे चार इसमांकडे दोन मोटर सायकल विना नंबरच्या मिळून आल्या त्याचे चेस नंबर वरून पडताळणी केली असतात त्या मोटरसायकल शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपी प्रथमेश शशिकांत मोहिते(19) शिंगणापूर मुळे कॉलनी, पीयूष रवींद्र पाटील (18)आनंद बार मागे शिंगणापूर,साईप्रसाद संतोष सोनार(18)मस्कर मळा हणमंतवाडी, रोहित बाळासाहेब पाटील(19)खाणसरी पाण्याची टाकी अश्या चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 1,25000 रुपयांच्या दोन मोटर सायकल राजवाडा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
ही कामगिरी सतीशकुमार गुरव पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली PSI संदीप जाधव, परशुराम गुजरे, सतीश बांबरे, प्रशांत पांडव, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रीतम मिठारी, गजानन गुरव, अमर पाटील, संदीप माने, संदीप बेंद्रे, गौरव शिंदे, योगेश गोसावी व नितेश कुऱ्हाडे यांनी ही सदरची कारवाई केलेली आहे.