खारेपाटण येथे भ.महावीर जन्मकल्याणोत्सव निमित्ताने २ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : विर सेवा दल शाखा खारेपाटण व दिगंबर जैन समाज सेवा मंडळ खारेपाटण तसेच सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा कणकवली व राष्ट्रीय सेवा योजना कक्ष – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने भ.महावीर जन्मकल्याणोत्सव निमित्ताने जैन बांधवांच्या वतीने रविवार दि. २ एप्रिल, २०२३ रोजी महावीर भवन खारेपाटण बाजारपेठ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजेंद्र ब्रम्हदंडे यांनी दिली.

भ.महावीर यांच्या जन्मकल्यान महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रक्तदान शिबिराचा शुभारंभ रविवार दि. २ एप्रिल, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे अल सिफा डेंटल क्लिनिक खारेपाटण तर्फे डॉ.अमीन पाटणकर यांच्या वतीने मोफत दंत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती रक्तदान शीबिर आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

या रक्तदान शबिरात सहभागी होण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते केतन आलते – (७७०९९०४९२६), शीतल कावळे – ( ९०२१५७५०५०), राजेंद्र ब्रम्हदंडे – (८८३०९८३३८०), मोहन कावळे – (९२७०४१५१५१), विजय कळत्रे – (९४२३२८१६३१) या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!