वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे कुंभारवाडी येथील रहिवासी संतोष रघुनाथ नेवरेकर यांनी मुंबई विद्यापीठ कर्मचारी पतपेढी निवडणूकीत यश संपादन केले आहे. विद्यापीठ सेवक पॅनल मधुन ते निवडणूकीत सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.