2500 ची तपासणी होणार फक्त 499 रुपयांत
2 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या शाखांत आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : हृदयरोगींसाठी माधवबागच्या वतीने भव्य हृदयरोग तपासणी शिबिराचे २ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपासचा सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सुज असणे, अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी या शिबिरात स्ट्रेस टेस्ट तपासणी करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे २५०० ची ही तपासणी माधवबागच्या वतीने केवळ ४९९ रुपयांत उपलब्ध होणार आहे.
अँजिओप्लास्टी व बायपास नंतर मांसपेशींना रक्त पोहचविण्यातील अडथळा दूर झालेला आहे की नाही हे शोधण्याचे प्रमाण म्हणजेच ही टेस्ट होय. यामुळे हृदयाची कार्यक्षमता लक्षात येते. हृदयाला रक्त पुरवठा सुरळीत चालू आहे की नाही हे लक्षात येते. हृदयाचा रक्तपुरवठा ब्लॉकेज सारख्या त्रासाने अडत असल्यास ते तपासणीमध्ये कळते. या तपासणी शिबिरासक्तही नावनोंदणी आवश्यक असून नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी कणकवली 9373183888, कुडाळ 9011328581 आणि सावंतवाडी 7774028185 या नंबरवर संपर्क साधावा.