ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अपील फेटाळले
कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या समर्थक असलेल्या भिरवंडे ग्रामपंचायतच्या पदच्युत सरपंच सुजाता संतोष सावंत यांचे अपील ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी फेटाळले आहे. त्यामुळे पदच्युत सरपंच सुजाता सावंत यांची सरपंच पदावरून बडतर्फी कायम झाली आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी भिरवंडे सरपंच सुजाता सावंत यांना सरपंच पदावरून बडतर्फ केले होते.या निर्णयाविरोधात सुजाता सावंत यांनी ग्रामविकासमंत्र्यांकडे अपील केले होते. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी पदच्युत सरपंच सुजाता सावंत यांचे अपील वर निर्णय देताना त्यांना सरपंच पदावरून बडतर्फ करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.