चला जाऊ या, आम्ही यमुना तिरी न्हाऊ या ss
वरचे वरी, हवा डोंगरी, बंगला बांधीला उंचेवरी sss
गोमूच्या नाचगाण्यानी बाजारपेठ थिरकली
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट मध्ये होलिकोत्सव च्या खाणाखुणा विरळ होत चालल्या असताना, रविवारची संध्याकाळ लोरे- हेळेवाडी येथील गोमूपथकाने फोंडाघाट बाजारपेठेत, आपल्या लोककलेने सर्व सर्वांना थिरकावण्यास लावले. चला जाऊ या,, जाऊ या, आम्ही यमुना तिरी जाऊ या– अन् वरचे वरीs हवा डोंगरीss बंगला बांधीला उंचेवरी sss त्यांना झांजवादक, ढोलकी, डफ,तुणतुणे यांच्या पारंपारिक नादानी आणि गोमूच्या नाचाने बहार आणली .मोबाईल आणि सोशल मीडिया तसेच रिलस च्या जमान्यात गोमूचे खेळे लोप पावत चाललेअसताना ,नव्या पिढीला पालक वर्ग या कलेला आपल्या पाल्यांना अवगत करीत होते. गेल्या चार पिढ्या लोरे-हेळेवाडी येथील हे गोमूपथक आजूबाजूच्या परिसरासह फोंडाघाट बाजारपेठेत आपली गोमू लोकनृत्य विविध पारंपारिक गाण्यांच्या माध्यमातून सादर करून,आपली सेवा रुजू करीत आहेत. त्यांचे कौतुकही होते. आणि बक्कळ बिदागी ही मिळते. फोंडा बाजारपेठ,त्यामुळे बाजाराच्या पूर्वसंधेवर गोमू गाणी व नृत्याने बहरली असून जुन्या जाणकारांना होलिकोत्सवाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.