माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने संस्थेचा ४१ व्या वर्धापन दिन व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध , वक्तृत्व व हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये खुल्या गटातून वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी चे कलाशिक्षक मंदार सदाशिव चोरगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल त्यांना संत रविदास भवन इमारत उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कुडाळ मतदार संघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
