मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
शिवनेरी (प्रतिनिधी) : किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन त्यांनी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा दिला आणि अभिवादन केले.यावेळी स्थानिक आमदार शरद दादा सोनावणे व स्थानिक नेत्या आशाताई बुचके यांनी मंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले.










