कणकवली तसेच देवगड तालुक्यात २१ व २२ मार्च २०२५ रोजी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

आचरा (प्रतिनिधी) : “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, सिंधुदुर्गचे सुपुत्र व सीमाशुल्क विभागात कार्यरत असणारे सत्यवान यशवंत रेडकर यांचे विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ते कणकवली तसेच देवगड तालुक्यात २१ व २२ मार्च २०२५ रोजी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार आहेत.

शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२५ सकाळी ०८.०० वाजता, स्थळः विद्या मंदिर हरकुळ खुर्द, मु.पो.हरकुळ खुर्द, ता. कणकवली तसेच शनिवार, दिनांक २२ मार्च २०२५, सकाळी ०८.०० वाजता, स्थळः कासार्डे माध्यमिक विद्यालय व विज्ञान, कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, कासार्डे, ता. कणकवली, शनिवार, दिनांक २२ मार्च २०२५, सकाळी ११.०० वाजता, स्थळः फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचालित, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स व्होकेशनल सायन्स फोंडाघाट, ता. कणकवली, शनिवार, दिनांक २२ मार्च २०२५, सायंकाळी ०५.०० वाजता, स्थळः कमलाबाई वा.पाटणकर शाळा नं १, दाभोळे, देवगड येथे स्पर्धा परीक्षांद्वारे करियर घडवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, सिंधुदुर्गचे सुपुत्र व सीमाशुल्क विभागात कार्यरत सत्यवान यशवंत रेडकर हे विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तसेच नियोजित संबंधित ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी पुढील भवितव्याच्या अनुषंगाने उपस्थित राहून या नि:शुल्क मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!