महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयचे आयोजन
मसूरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने डोंबिवली येथे आयोजित दशावतार प्रशिक्षण शिबीराचा समारोप नुकताच झाला. शिबिर संचालक दाजी (समीर) लक्ष्मण नार्वेकर आणि प्रकाश पांडुरंग लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ डोंबिवली यांच्या मार्फत हे दशावतार शिबिर पार पडले.
या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थी कलावंतांनी प्रशिक्षणाचा आनंद घेत हे प्रशिक्षण पूर्ण केले. या दशावतार शिबिरासाठी प्रकाश लब्दे, संतोष मेस्त्री, नारायण(बंटी) कदम आणि पखवाज वादक गीतकार संगीतकार सचिन भरत परब यांनी प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत प्रत्येक विदयार्थ्याकडून वेगवेगळ्या भूमिकांचे सादरीकरण करून घेतले. या दशावतार शिबिराचे उदघाटन लोकसेवा समिती अध्यक्ष रामचंद्र(बाळा) परब, डोंबिवलीकर भजन हितवर्धक महासंघाचे अध्यक्ष भजनाचार्यप्रकाश चिले, लोककला दशावतार नाट्यमहोत्सव संस्थेचे अध्यक्ष डॉ. निलेश मुळीक, पखवाज वादक दत्तगुरु गोसावी तसेच जेष्ठ दशावतारी कलावंत विष्णु (आप्पा) चव्हाण यांच्या हस्ते पार पडले.
सहभागी झालेल्या विध्यार्थी कलाकारांनी अतिशय सुंदर सादरीकरण केले. या आजच्या नव्या पिढीचे या दशावतार कलेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजीत पवार, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आणि अपर मुख्य सचिव विकास खारगे (भा.प्र.से.) आणि सांस्कृतिक कार्य विभाग संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई विभीषण चवरे यांनी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल या सर्वांचे शिबिर संचालक दाजी(समीर) नार्वेकर आणि प्रकाश पांडुरंग लब्दे प्रस्तुत देवी भगवती पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ डोंबिवलीच्या वतीने आभार मानन्यात आले.













