जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले निवेदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातुन आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेतील रुग्णांकडून वेगवेगळी कारणे दाखवत अतिरिक्त पैसे उकळले जात आहेत. अशा खाजगी रुग्णालयांवर कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
केंद्र व राज्य सरकारच्यावतीने सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले आनंददायी योजना सुरू केली आहे. सर्वसामान्य जनतेला सरकारच्या या योजनेमुळे काहीसा दिलासा मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठराविक हॉस्पिटलमध्ये या योजना राबविल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत उपचार केलेल्या रुग्णाचे उपचाराचे बिल सरकारकडून दिले जाते. परंतु काही खाजगी रुग्णालयांमधून रुग्णांवर केलेल्या उपचाराचे वेगवेगळी कारणे दाखवून, सरकारच्या डोळ्यात धूळ फेक करीत आहेत.
रुग्णांना उपचार चांगला मिळावा म्हणून त्यांचे नातेवाईक निमुटपणे पैसे भरत आहेत. त्यांना कोणतेही बिल दिले जात नाही. कणकवलीतील मोठ्या हॉस्पिटल मध्ये असे प्रकार चालू आहेत. कोणत्या आजारासाठी किती रक्कम असावी. असे फलक दर्शनी भागात लावणे बंदरकारक असताना देखील काही रुग्णालयामध्ये ते लावलेले दिसत नाहीत. या अगोदर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत आवाज उठवला होता. तरी गेल्या महिनाभरात सदरील योजनेतून किती रुग्णांवर उपचार झाले याची माहिती घेऊन त्यांना संपर्क करून त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे घेतले का याची खात्री करावी, रुग्णांमध्ये दडपण येणार नाही असं असं त्यांना आश्वासन द्यावे. ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये असे प्रकार होत आहेत. शासनाच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्या या रुग्णांलायावर कारवाई करावी. व रुग्णांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करावे. असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री देवगड तालुका सचिव जगदीश जाधव वैभववाडी विभाग अध्यक्ष विनोद विटेकर देवगड विभाग अध्यक्ष राजन पवार आदी उपस्थित होते.
