मंत्री नितेश राणे यांनी राजीनामा द्यावा; युवा सेनेच्या वतीने पोलिसांना निवेदन

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचे मंत्री नितेश राणे हे वारंवार हिंदू मुस्लिम समाजात धार्मिक तेढ निर्माण होणारी स्टेटमेंट करत आहेत. चिथावणीखोर भाषणे करून दंगल घडवू पाहत आहेत. २०१४ पूर्वी संवेदनशील असलेला सिंधुदुर्ग जिल्हा मागील १० वर्षे शांत झाला होता. नितेश राणे पुन्हा सिंधुदुर्ग जिल्हा संवेदनशील बनवीत असल्याची टीका करत युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी नितेश राणे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली. तसे निवेदन युवा सेनेच्या माध्यमातून कणकवली पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, गुरु पेडणेकर, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री, मंगेश राणे, अविनाश सावंत, आशिष मेस्त्री चेतन गुरव आदी उपस्थित होते

error: Content is protected !!