श्री देव मल्हारी मार्तंड जय मल्हार देखावा विशेष आकर्षण
मसूरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड या मठाचा सहावा वर्धापन दिन सोहळा, तसेच अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा ३१ मार्च रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त ३० व ३१ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक ३१ मार्च रोजी पुणे जेजुरी गड कडेपठारावरील श्री देव मल्हारी मार्तंड यांच्या येळकोट येळकोट जय मल्हार देखाव्याचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ मालिका फेम श्री स्वामींची भूमिका साकारलेले अभिनेते अक्षय मुडावदकर यांच्या हस्ते सकाळी ९:३० वाजता होणार आहे. यानिमित्त होणारे कार्यक्रम ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता शिरगाव पावणादेवी मंदिर ते श्री स्वामी समर्थ मठ हडपिड पर्यंत पालखी मिरवणूक, सायंकाळी ७ वाजता पुणे जेजुरी गड, कडेपटारावरील श्री देव मल्हारी मार्तंड यांच्या सत्वांचे आगमन.
३१ मार्च रोजी सकाळी सकाळी ५ ते ९ वाजता या कालावधीत श्री गणेश पूजन, पादुकापूजन, अभिषेक, होमहवन, श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ९:३० वाजता मल्हारी मार्तंड यांच्या देखाव्याचे अक्षय मुडावदकर यांच्या हस्ते उद्घाटन, सकाळी १० वाजता लघुरुद्र कुंकूमार्चन, दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा, दुपारी १२:३० वाजता महाआरती, दुपारी १ ते २:३० महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता गोंधळ, सायंकाळी ६ वाजता सुस्वर भजने, सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसाद, रात्री १० वाजता तुफानी विनोदी लोकनाट्य कोकणचा साज संगमेश्वरी बाज आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे, संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण स्वामीरत्न पूरस्कार सन्मानित नंदकुमार पेडणेकर व विश्वस्त खजिनदार ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.
