दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन

‘भविष्यातील सिंधुदुर्ग आणि माध्यमांची भुमिका’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन

ओरोस (प्रतिनिधी) : ‘सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव -2024’ चे आयोजन रविवार दि.23 आणि 24 मार्च 2025 रोजी पत्रकार भवन ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रविवार दि. 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.

दोन दिवसीय या ग्रंथोत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार दि 24 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता ‘भविष्यातील सिंधुदुर्ग आणि माध्यमांची भुमिका’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिसंवादामध्ये जिल्ह्यातील विविध माध्यम तज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, दै. तरुण भारत संपादक शेखर सामंत, दै. पुढारी आवृती प्रमुख गणेश जेठे, दै. लोकमत चे आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक, दै.सकाळ चे आवृत्ती प्रमुख शिवप्रसाद देसाई, दै. प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर, दै. रत्नागिरी टाइम्स चे आवृत्ती प्रमुख लक्ष्मीकांत भावे, दै. कोकणसाद चे संपादक संदीप देसाई , वृत्तवाहिनी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल रेवडेकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील सहभागी होणार आहेत. या परिसंवादाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले आहे.

error: Content is protected !!