शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे प्रतिपादन

राज्यकार्यकारीणी सभा कोल्हापूर येथे संपन्न

मसुरे (प्रतिनिधी) : राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या विधिमंडळात मांडून त्या पूर्ण करण्यासाठी माझ्या वतीने शक्य तेवढे सगळे प्रयत्न करीन. महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची डिरेक्टरी तयार करा, म्हणजे त्या शिक्षकांची माहिती राज्यातील इतर शिक्षकांना होईल. या शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा त्यांच्या शाळेपुरता मर्यादित न राहता राज्याला होईल असे मत पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त संघाच्या दि प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राज्य कार्यकारणी सभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. संघटनेचे राज्य अध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथे ही सभा संपन्न झाली. यावेळी बोलताना अध्यक्ष जिरवणकर म्हणाले, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील मंत्री महोदय आमदार यांना निवेदन आपले प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून द्यावेत. प्रास्ताविक राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे सिंधुदुर्ग यांनी केले त्यामध्ये त्यांनी संघटनेचे आतापर्यंतची झालेली वाटचाल विशद केली .राज्य कार्यकारिणीच्या मागील सभांचा आढावा सरचिटणीस अनंता जाधव पुणे यांनी घेतला.

या सभेमध्ये सन २०२२ मध्ये राज्यातील राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि सेवानिवृत्त राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान आमदार प्रा. जयंत तासगावकर हस्ते करण्यात आला.यावेळी डॉ.संजय जगताप कोल्हापूर यांची संघटनेच्या राज्य प्रसिद्ध प्रमुख म्हणून निवड करण्यात आली तर डॉ.श्रीकांत पाटील यांची कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष, संजय मगदूम यांची कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी निवड करण्यात आली.यावेळी सिंधुदुर्ग संघाचा अहवाल जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत यांनी राज्याध्यक्ष यांना सादर केला.या कार्यकारणी सभेसाठी गोंदिया पासून सिंधुदुर्ग पर्यंत जवळपास दोनशे राष्ट्रीय,राज्य आदर्श शिक्षक उपस्थित होते.ही सभा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शाहू चौगुले,सरचिटणीस नवनाथ व्हरकट, कार्याध्यक्ष संजय जगताप , कोषाध्यक्ष हिंदुराव मातले, विभागीय अध्यक्ष सतीश चिपरीकर ,राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे,डॉ. श्रीकांत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यकारणी सभेसाठी एस.के.मठपती मुंबई उच्च न्यायालय वकील, सुनील एडके चेअरमन शिक्षक बँक, रामदास झेंडे संचालक शिक्षक बँक,शशिकला पाटील, मच्छिंद्र कुंभार, सुनील सुतार,विमल चौगुले, सुमित्रा येसने,माधव वायचळ,सुनील गुरव, नागोराव तायडे, प्रदीप शिंदे,शिवराज सावंत,आनंद जाधव,संदीप शिंदे,नंदन घोगळे, जी.के. देशमुख, रंजना पाटील,स्नेहलता राणे, राजेंद्र देसाई, संतोष जाधव, नागनाथ येवले, प्रशांत राऊत, सिद्धाम माशाळे, रमेश पेटकर आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ व्हरकट यांनी केले तर आभार शाहू चौगुले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!