सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा आळवळी येथील तेरेखोल नदीपात्रात आज सकाळी अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी याची माहिती बांदा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, कर्मचारी विजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचे काम सुरु आहे.