अन्यथा पोलीस ठाण्यासमोर उपोषण
सूर्यकांत तावडे यांचे एस.पिं. ना निवेदन
कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी येथील राड्यातील संशयित आरोपिंवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या आरोपींकडून जीवाला धोका असून दोन दिवसांत कारवाई करा अन्यथा कणकवली पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा सूर्यकांत विष्णू तावडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे. कनेडी हल्ल्यातील सागर सावंत,संजना सावंत , सुनील सावंत, संजय सावंतअशोक कांबळे, मिलिंद मेस्त्री,सर्वेश दळवी, स्वप्नील चिंदरकर, प्रफुल्ल काणेकर, किशोर परब, संजय उर्फ बाबू सावंत, धोंडी वाळके,शुभम सावंत,प्रदीप कांबळे, दत्ताराम गावकर यांच्यावर भा. दं. वि. 307, सह अन्य कलम आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्ह्यात भा दं वि 353 सह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल आहे.या आरोपींवर कारवाई न।झाल्यास आपल्या जीविताला धोका असल्याचेही तावडे यांनी निवेदनात म्हटले आहे. कारवाई न झाल्यास कणकवली पोलीस ठाण्यासमोर उपोषण छेडण्याचा इशारा तावडे यांनी दिला आहे.