आमदार नितेश राणे यांनी भाजपा मध्ये केले स्वागत
विजयदुर्ग (प्रतिनिधी) : विजयदुर्ग येथील उद्धव ठाकरे गटाचे शाखाप्रमुख सुरेंद्र श्रीधर सागवेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.सुरेंद्र सागवेकर यांच्या प्रवेशामुळे विजयदुर्ग मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना संपल्यात जमा आहे.
विजयदुर्ग ग्राम पंचायतीवर भाजपाच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांनी निर्विवाद सत्ता स्थापन केली व तेथे विकासाची गंगा सुरू झाली. आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे सुरेंद्र सागवेकर यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांनी सुरेंद्र सागवेकर यांचे कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भाजपा मध्ये स्वागत केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, संदीप साटम, बंड्या नारकर, तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली, युवक सेलचे तालुकाध्यक्ष उत्तम बिरजे, विजयदुर्ग चे माजी सरपंच प्रसाद देवधर, महिला तालुकाध्यक्ष उष्ककला केळुसकर, माजी नगरसेवक नीरज घाडी उपस्थित होते