जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे यश

सिद्धेश भंडारी व ओम गोरे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘सेफ्टी शू’ या प्रतिकृतीस तृतीय क्रमांक प्राप्त

वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मध्ये आयोजित जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत अनुदानित शाळा गटात अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या सिद्धेश भंडारी व ओम गोरे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘सेफ्टी शू’ या प्रतिकृतीस तालुकास्तरावर प्रथम व जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्यांच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका एस.ए.सबनिस, शिक्षकेतर कर्मचारी स्वप्निल बावदाणे यांचे अभिनंदन केले. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, शिक्षिका एस.ए.सबनिस, स्वप्निल बावदाणे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!