फोंडाघाटच्या क्षितिजावरील चमकता तारा – प्रथमेश लाड !

ध्येयप्राप्तीसाठी निग्रह, जिद्द, परिश्रम आणि अभ्यास यांचे सदैव आचरण केल्यास, प्रत्येक जण यशस्वी होईल – प्रथमेश

नौसेना दलात निवड झालेल्या फोंडाघाट हायस्कूलच्या प्रथमेश लाड याचा द्दद्य सत्कार ! मित्रपरिपरिवार आणि ग्रामस्थांकडूनही गौरव !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज माझ्या शाळेतील एन.सी.सी. कॅडेटच्या उपस्थितीत आणि गुरुजनांचे हस्ते होत असलेला सत्कार,माझ्या नौसेनेतील यशाचा प्रेरणादायी पाया ठरेल. असे उद्गार प्रथमेश लाड यांनी व्यक्त केले. न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या एन.सी.सी. च्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी, प्रथमेश प्रमोद लाड याची भारतीय नौसेनेमध्ये निवड झाल्यानंतर, अन् बेसिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून तो गावी आल्यावर, त्याचा शाळेमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी तो बोलत होता. प्रशालेतील कर्मचारी प्रमोद लाड यांचा हा मुलगा ! आपल्या सुपुत्रांने आपल्या गावाचे, शाळेचे नाव उंचावल्याचा सार्थ अभिमान, वडील प्रमोद यांच्या डोळ्यातून ओसंडत होता.

यावेळी उपस्थित शेखर लिंग्रस, रंजन नेरूरकर, संदेश सावंत, सुभाष सावंत यांनी संस्थेमार्फत, प्रथमेश चा सत्कार केला. मुख्याध्यापिका रेवडेकर, पर्यवेक्षक प्रसाद पारकर, यांनी शाळेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, प्रथमेशला भेट देताना, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर एनसीसी कॅडेट्स व शिक्षकांसह, आपली प्रशिक्षण दरम्यानच्या प्रेरणादायी आठवणींना प्रथमेशने उजाळा दिला. ध्येयप्राप्तीसाठी स्वतःचा निग्रह, जिद्द, परिश्रम आणि अभ्यास याप्रती निष्ठा ठेवल्यास, प्रत्येक जण यशस्वी होईल. असे प्रथमेशने सांगितले.दिवसभर त्याचे घरी मित्रपरिवार — ग्रामस्थांनी भेट घेऊन त्याच्या यशाचे कौतुक करताना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!