कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक २९ मार्च २०२५ रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली क्र. ०१ यांना दोन पंच आणि स्टाफसह असे सर्वजण मिळून खाजगी वाहनाने गस्तीवर असताना ओसरगाव टोलनाक्याच्या बाजूला कणकवलीच्या दिशने उभा करुन ठेवलेला बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH-१५/GV-११७८ या वाहनाची ट्राफिक पोलीसांसमवेत तपासणी केली असता वाहनावर वाहनचालक नसल्याचे दिसून आले. या वाहनाचा संशय आल्याने या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये गोवा बनावटी दारुचे एकूण ७९ बॉक्स जप्त करण्यात आले. सदर मिळून आलेले ७९ बॉक्स व बोलेरो पिकअप क्रमांक MH-१५/GV-११७८ असा एकूण रु १२,८६,०००/- किंमतीचा मुद्येमाल दारुबंदी गुन्हयांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. या गुन्हयातील अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरील कारवाई अधीक्षक मनोज शेवरे यांच्या प्रत्यक्ष मागदर्शनाखाली एस.डी.पाटील दुय्यम निरीक्षक, यांनी कारवाई केली, सदर कारवाईमध्ये एस.डी.पाटील, दुय्यम निरीक्षक, जे.एस. मानेमोड व संतोष घावरे, दुय्यम निरीक्षक, एस.एस. चौधरी सहाय्यक दुय्यम निरीक्षक, एस.एस. कुवेसकर महिला जवान ए.टी. गावडे जवान, व ट्राफिक पोलीस हवालदार कॅलिस डिसोजा व नितीन चोडणकर यांनी मदत केली. पुढील तपास एस.डी.पाटील दुय्यम निरीक्षक करीत आहेत.













