कासार्डे, तळेरे पंचक्रोशीतील सकल हिंदु समाजातर्फे शोभायात्रा काढून नववर्षाचे जंगी स्वागत; शोभायात्रेचे तिसरे वर्ष

तळेरे (प्रतिनिधी) : चैत्रशुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने कणकवली तालुक्यातील सकल हिंदू समाज पंचक्रोशी कासार्डे, तळेरे वतीने नववर्ष स्वागत यात्रा रविवारी सकाळी मोठया उत्साहात काढण्यात आली. या शोभायात्रेचे तिसरे वर्ष असून कासार्डे तिठा येथून नववर्ष स्वागत शोभायात्रा निघून तळेरे बाजारपेठ मार्गे तळेरे एसटी स्टॅन्ड समोरील रंगमंचावर नववर्षच्या जल्लोषात घोषणा देत समारोप करण्यात आला.

या शोभायात्रेत सर्वात पुढे भगवा धर्म ध्वज नेतृत्व करीत सोबतीला,लहान मुले,पुरुष व महिलांनी पारंपरिक पोषाख परिधान कासार्डे तिठ्ठा येथून भव्यदिव्य शोभायात्रा निघत परिसर हिंदू नववर्षाचा जयघोषाने दणाणून सोडला. दरम्यान महिला व पुरुषांनी पारंपारिक पोषाख परिधान करून शोभायात्रेत कासार्डे, तळेरे पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, समाजिक कार्यकर्ते, लहान मुलांसह वयोवृध्द पर्यंत ग्रामस्थ उस्फुर्तपणे सहभागी झाले होते. शेवटी शोभायात्रेसाठी यशस्वी होण्यासाठी ज्यानी ज्यानी सहकार्य केले व सहभागी सर्वांचे आभार मानत समारोप करण्यात आला.

error: Content is protected !!