खारेपाटण हायस्कूल विद्यार्थ्यांच्या सेवेला नवीन वर्षात स्कूल बस दाखल

माजी विद्यार्थी महेश शेट्ये यांचे विशेष सहकार्य

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व कै. प्रभाकर पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज खारेपाटण व कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण तसेच पूर्व प्राथमिक विभाग या सर्व विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयी करीता या शाळेचे माजी विद्यार्थी व साबा सॉफ्टवेअर व इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचे फायनांस मनेजर महेशजी शेट्ये यांनी या कंपनीच्या सी आर एस फंडातून सुमारे १८ सीटर मर्यादा असलेली स्कूल बस मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

आज रविवार दी.३० मार्च २०२५ रोजी मराठी नव वर्षाच्या शुभमुूहर्तावर गुडी पाडव्या दिवशी स्कूल बसचे देणगीदार व शाळेचे माजी विद्यार्थी महेश शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण हायस्कूल येथे या नवीन स्कूल बसचे शेट्ये यांचे शुभ हस्ते पूजन करण्यात आले. तर खारेपाटण शिक्षण संस्थेच्या वतीने स्कूल बस देणगीदार महेश शेट्ये यांचे उपाध्यक्ष भाऊ राणे यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे,सरचिटणीस – महेश कोळसुलकर,सह सचिव – राजेंद्र वरुणकर,खजिनदार – संदेश धुमाळे तसेच संस्थेचे विश्वस्त व खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे सर, मोहन कावळे, विजय देसाई, दादा कर्ले, प्रशांत गुळेकर,दिगंबर राऊत, योगेश गोडवे, तसेच पत्रकार खारेपाटण पतपेढीचे संचालक संतोष पाटणकर,संचलीका श्रद्धा देसाई,माजी ग्रा.पं.सदस्य सोनल लोकरे,ग्रामस्थ शेखर राणे, पराडकर, खारेपाटण हायस्कूलचे पर्यवेक्षक संतोष राऊत, खारेपाटण कॉलेजचे प्रा. दयानंद कोकाटे, पाडवी सर, खारेपाटण हायस्कूल ग्रंथपाल यशवंत रायबागाकर, भिसे सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तर खारेपाटण शिक्षण संस्थेच्या वतीने स्कूल बस देणगीदार महेश शेट्ये यांछा संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे यांचे शुभहस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. लवकरच या स्कूल बसचे लोकार्पण विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार असल्याचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांचेकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!